जाहिरात
बीड । वार्ताहर
बहिरवाडी येथील मंडप व्यवसायी महारुद्र खांडे यांचा काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतील 500 रुपयाचा अपघाती विमा काढलेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटूंबीयास बँकेच्यावतीने बँकेचे महा व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांच्या हस्ते दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.
त्याच प्रमाणे नेकनूर येथील शिक्षक सारंग काळे यांचाही अपघाती मृत्यू झाला होता त्यांनी देखील इंडिया बँकेतून अपघाती विमा काढलेला होता. तसेच त्यांनी एसबीआय जनरल कंपनीचा एक हजार रुपयांचा अपघाती विमा काढला होता.सारंग काळे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदाराला याची माहिती नव्हती. त्यांनी बँकेत येवून शाखाधिकारी बनसोडे यांची भेट घेवून पतीचे निधन झाल्याचे सांगीतले, तेव्हा शाखाधिकार्यांनी खात्याचे स्टेटमेंट काढले. त्यामध्ये विमा काढल्याचे कळाले.
त्यानंतर एसबीआय जनरल कंपनीला सर्व कागदपत्रे सादर केली. व त्यांचा 20 लाखांचा विमा मंजूर झाला. दि.15 जुलै रोजी बँकेच्या शाखेत वारसदार यांना वीस लाखांचा धनादेश बँकेचे बीड जिल्ह्याचे सहाय्यक महाप्रबंधक नंदकिशोर भोसले यांच्या हस्ते देण्यास आला. यावेळी बँकेचे अधिकारी विवेक हरपाळेो, गुणवंत मदने, शाखाधिकारी जिया खान, विमा कंपनीचे सचिन घुले, विभागीय व्यवस्थापक दिपक देशमुख, राहुल गोसावी, सुशील कुलकर्णी प्रसाद आमटे आदिंची उपस्थिती होती.
Leave a comment