बीड मतदार संघात 5 महसुली मंडळास मान्यता
बीड | वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बीड तालुक्यातील पाच नवीन महसूल मंडळास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.तत्कालीन मंत्रिमंडळात असतानाच क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात डोंगरी गावे जाहीर करून नवीन महसुली मंडळ निर्माण करावेत यासाठी प्रयत्न केले होते यामुळे डोंगरी गावांना विविध सुविधा प्राधान्याने मिळाल्या आहेत
बीड जिल्ह्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या बीड तालुका हा सर्वात मोठा आहे शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी सज्जा यांच्याकडे असते शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना सोयीचे व्हावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून नवीन महसुली मंडळ व तलाठी सजा यांची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कडे बीड तालुक्यातील आणि खेड्यातील कार्यकर्ते करत होते जयदत्त क्षीरसागर यांनी तत्कालीन मंत्रिमंडळात असतानाच जिल्ह्यात नवीन तालुका निर्मितीच्या वेळी डोंगरी गावे जाहीर करून त्यांना प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात तसेच नवीन महसुली गावे निर्माण करून स्वतंत्र तलाठी सज्जा तयार करावा अशी आग्रहाची मागणी केली होती, आमदार असताना तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्यामार्फत प्रारुप आराखडा तयार करून नवीन महसूल मंडळे व तलाठी सज्जे निर्माण करण्यात आले होते गेल्या तीन वर्षापासून हा आराखडा मंजूर अभावी शासन दरबारी पडून होता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सततचा पाठपुरावा करून बीड तालुक्यातील घाटसावळी, पारगाव सिरस ,कुर्ला, चराटा व येळंबघाट या ठिकाणी या नवीन महसूल मंडळास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिल्याने यामुळे सर्व सामान्य, व शेतकरी बांधवांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a comment