नवे 1314 नवे रुग्ण; 1308 जणांना सुटी 

बीड । वार्ताहर

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसह आता मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि.7) जिल्ह्यात कोरोनाचे नवे 1314 रुग्ण निष्पन्न झाले. तसेच 3 ते 7 मे दरम्यानच्या 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद झाली तर 1308 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

जिल्ह्यात गुरुवारी 4 हजार 112 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 2 हजार 798  जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 1314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 419 रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी 42, धारुर 91,गेवराई 54, केज 100, माजलगाव 76, परळी 123, पाटोदा 66, शिरुर 67 व वडवणी तालुक्यातील 34 रुग्णांचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी 19 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात 
अंबिका चौक बीड येथील 43 वर्षीय महिला,पंचशीलनगर येथील 45 वर्षीय महिला,  तेलगाव नाका,बीड येथील 72 वर्षीय पुरुष काकडहिरा (ता.बीड) येथील 60 वर्षीय पुरुष,  नेकनूर (ता.बीड) येथील 70 वर्षीय महिला, भवानवाडी (ता.बीड) येथील 60 वर्षीय पुरुष, देवदहिफळ (ता.धारुर) येथील 41 वर्षीय पुरुष, आम्ला (ता.गेवराई) येथील 65 वर्षीय पुरुष, सारणी (ता.केज) येथील 75 वर्षीय पुरुष, होळ (ता.केज) 58 वर्षीय महिला, एकदरा (ता.माजलगाव) 70 वर्षीय पुरुष, फुलेपिंपळगाव (ता.माजलगाव) 50 वर्षीय पुरुष, रोहतवाडी (ता.पाटोदा) येथील 73 वर्षीय महिला, येथीलच 70 वर्षीय पुरुष, पाडळी (ता.शिरुरकासार) 61 वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील जैन गल्ली येथील 66 वर्षीय महिला, दत्तपूर (ता.अंबाजोगाई) येथील 46 वर्षीय पुरुष, बन्सीलाल नगर,अंबाजोगाई येथील 67 वर्षीय पुरुष व आरणवाडी (ता.धारुर) येथील 81 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.आता एकूण रुग्णसंख्या 63 हजार 813 इतकी झाली असून यापैकी 56 हजार 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण बळींचा आकडा 1063 इतका झाला आहे अशी माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.