गेवराई । वार्ताहर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले असून विनाकारण बाहेर फिरणार्‍या हिंडफिर्‍यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठ्यांचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून न.प.च्या वतीने विनामास्क फिरणार्‍यावर कारवाई करत शुक्रवारी दिवसभरात एकूण 85 जणांवर संयुक्त कारवाई करत 24 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली आहे. 

 

 

दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या नेतृत्वाखाली गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यात येत असून रोज विविध ठिकाणी कारवाया करत दंड वसुली करण्यात येत आहे. यामध्ये आज  सकाळपासून गेवराई शहरातील शिवाजी चौक 45 जणांवर कारवाई तर खामगाव चेक पोस्ट या ठिकाणी 40 जणांवर कारवाई करत एकूण 22 हजार हजार रु. तर नगर परिषदेच्या वतीने विना मास्क फिरणार्‍या 13 जणांवर कारवाई करत 2 हजार 100 रु. दंड वसुली करण्यात आली. अशा सर्व मिळून 85 कारवाया करत एकूण 24 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार,न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे, सपोनि प्रफुल्ल साबळे, संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, मनीषा जोगदंड, अर्चना भोसले, पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने, गणेश नागरे, हनुमान जावळे, अमोल खटाने, परमेश्वर तागड, एकनाथ कावळे, नप चे येवले, निकम, यांच्यासह जि.प.शिक्षक आदींनी या कारवाया केल्या असून या कारवाईने मोकाट फिरणारांना चाप बसत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.