जातेगाव । वार्ताहर
कोरोना रोखण्यासाठी जेष्ठ मंडळी व व्यापारी, पञकार, उद्योजक प्रत्येकांनी लस घेऊन कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच अॅन्टीजेन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहन युवा नेते प्रितम गर्जे यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगाव व तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 5 मे रोजी कोव्हीडशिड लसीकर सुरु झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शासनाचे नियम पालन करावे. कोरोना प्रतिबंधक लस पुर्ण पणे सुरक्षित आहे.प्रत्येकांनी अॅन्टीजेन टेस्ट करावी असे आवाहनही प्रितम गर्जे यानी केले आहे. आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वत:ची व समाजाची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Leave a comment