उपकेंद्रावर लसीकरण करायला अडचण काय?
लसीकरण नोंदणी नियोजनात संभ्रमावस्था, नागरिकांमध्ये गोंधळ
केज । वार्ताहर
कोविड लसीकरण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरु आहे लोक जागृती झाल्याने नोंदणीसाठी आणि लसीकरणासाठी आरोग्य केंद्रामध्ये तोबा गर्दी जमत आहे त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. गर्दीमुळे नागरिकांना कोविड ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाच्या नियोजनाची कमतरता ,लोकांमध्ये संभ्रमावस्था यामुळे सर्वत्र गर्दीचे चित्र तालुक्यात पहावयास मिळाले. उपकेंद्रावर शासनाने लसीची व्यवस्था केल्यास गर्दी आणि गोंधळ कमी होईल असे दिसून येते.
केज तालुक्यात ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी लोक लसीकरण केंद्र या ठिकाणी जात होती.प्रशसनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आज च्या परिस्थिती गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन मोठ्या गावात जसे बनसारोळा,वडगाव,चिंचोली, राजेगाव,विडा, आडस
ठिकाणी बऱ्याच गावातील लोकांना बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहे
आज युसूफ वडगाव ग्रामीण रूग्णालयात कोव्हिड 19ची लस घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी तोबा गर्दी केली होते लस मीळते की नाही या विचाराने सोशल डिस्टन्सिग चा फज्जा उडाला या जेष्ठ नागरीकांच्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाची चांगली च धावपळ झाली .
युसूफ वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येनारी गावे आपेगाव,बनसारोळा, युसूफ वडगाव या ठीकाणी कर्मचारी ठेउन गर्दी नियंत्रणात आणली .
जर जेष्ठ नागरिकांनी सोशल डिस्टन्सिग चा फज्जा उडाला
एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो आहे.
प्रशासनने याची दखल घेऊन त्वरित जेवढी इंजेक्शन उपलब्ध तेवढेच सोशल डिस्टन्सिग अंतर ठेउन नागरिकांना बोलावणे आवश्यक आहे
लसीकरण प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे तर अनेकांनी नोंदणी ऑफलाइन केलेली आहे त्यामुळे कोणाला लसीकरण कधी मिळणार याबाबत निश्चित वार व वेळ प्रशासनाकडून कळविण्यात येत नाही
नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचे हाल
लसीकरणाच्या नोंदणीसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे अनेक वृद्ध आणि जेष्ठ नागरिक रांगेत उभारण्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत
आरोग्य कर्मचारी विना मास्क
बनसारोळा येथील लसीकरण केंद्रावर अनेक आरोग्य कर्मचारी मास्क काढून आले तर अनेक नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांनी आपले मास्क तोंडावर आणि नाकावर न लावता हनुवटीवर लावल्याचे चित्र आढळून आले कोविड चा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
नागरिकांनी शिस्तीचे पालन करावे
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी शिस्तीचे पालन करावे तोंडावर मास्क लावल्याशिवाय लसीकरण केंद्रावर येऊ नये आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजन बद्दल लसीकरण मोहीम राबवावी
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विकास आठवले
Leave a comment