आ.सुरेश धस यांचे मात्र उल्लेखनीय
कार्य प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन
आष्टी । वार्ताहर
बीड जिल्ह्यामध्ये कोवीड प्रादुर्भावामुळे रुग्णांची मोठी संख्या असून प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांच्यात ताळमेळ नसल्याने कोणत्याच उपायोजना प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाची ञेधातिरपीट उडत आहे मात्र अशा परिस्थीतीत आ. सुरेश धस यांनी अहोरात्र परिश्रम करून अकराशे बेड्सचे विविध ठिकाणी सुरु केलेले छोटे छोटे कोवीड सेंटर हे महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याने केलेले नाही जे सुरेश धस यांनी केले आहे त्यामुळे हि अभिनंदनास्पद बाब अहाल्याचे मत विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारण्यात आलेल्या श्रीदत्त आयसोलेशन कोवीड केंद्राचे उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते.यावेळी आ.सुरेश धस,तहसिलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,सरपंच परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,जयदत्त धस,भाजपा ता.सरचिटणीस शंकर देशमुख,पं.स.सभापती बद्रीनाथ जगताप,रंगनाथ धोंडे,अनिल ढोबळे,डा.नितीन घोडके,सुनील रेडेकर,मनोज सुरवसे,विनय पटधरीया,आदी उपस्थित होते.दरेकर म्हणाले कि,बीड जिल्ह्यात कोरोना परिस्थीती हाताळण्यात अपयश आल्याच्या बातम्या येत असल्याने आपण मुद्दाम हून बीडचा दौरा केला. या ठिकाणी बीड जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे अनेक कोवीड सेंटरमधील रुग्ण तोंडाला मास्क न बांधता जनतेत मिसळतात,काही ठिकाणी कोवीड सेंटरवर जेवण मिळत नसल्यामुळे रुग्ण पळून जात असल्याचेही दिसून आले तर अंबाजोगाई येथे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे रुग्ण दगावण्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर सर्वात कहर म्हणजे एकाच रुग्णवाहिकेतून अनेक मृतदेह एकाच वेळेस नेण्याचा दुर्देंवी प्रकार या ठिकाणी घडला.यामुळे प्रशासन ढिसाळ असल्याचे यावरुन दिसून येत आहे.महाराष्ट्र शासनाचा टेस्टिंग कमी करण्याचा निर्णय हा केवळ रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी आहे असे दिसून आले आहे.परंतु असे करणे म्हणजे भविष्यात फार मोठा धोका पत्करण्या सारखे आहे. टेस्टिंगसाठी किड्स उपलब्ध करून देऊन सेवाभावी संस्था मार्फत जास्तीत जास्त टेस्टिंग करणे आवश्यक आहे.जेणेकरून रुग्णांची ओळख होऊन त्यांच्यावर उपाय योजना करता येईल.बीड जिल्ह्यातील या उपाय योजना गतिमान होतील यासाठी मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे तसेच तसेच आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये काही गरज पडल्यास आपण मदत करणार आहोत असे सांगून पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आष्टी साठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांचे कार्य उल्लेखनीय आहे. एकाच ठिकाणी जम्बो कोवीडसेंटर उभारुन त्यामध्ये विनाकारण रुग्णांचे हाल होण्यापेक्षा असे लहान लहान कोवीड सेंटर उभारल्यास रुग्णांची हेळसांड होत नाही आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात. हे सुरेश धस यांनी दाखवून दिले आहे.अशा प्रकारचे काम इतरांनी करावे असे आदर्श काम त्यांनी केले आहे असे सांगून लवकरात लवकर कोवीडचा प्रादुर्भाव कमी होवो अशी प्रार्थना करत असल्याचेही शेवटी दरेकर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार डा.दिपक भवर यांनी मानले.
डॉ.लहानेंचे वक्तव्य चुकीचे
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेलं राज्यातील कोरानाची लाट कमी होण्यास सुरुवात झाली आहे हे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. राज्यभरात बहुतांश ठिकाणी कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणार्या किटची कमतरता असल्यामुळे मागील 8 दिवसांपासून चाचण्याच बंद आहेत.कोरोनाची दाहकता वाढत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं कमी कमी पडत आहेत, अशा गंभीर परिस्थितीत डॉ. लहानेंचे वक्तव्य अतिशय चुकीच असल्याच मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
बीड जिल्हात वाढता प्रादुर्भाव आणि प्रशासनाची खंडीत झालेली व्यवस्तेची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांनी बीड जिल्हा दौऱ्यादरम्यान आष्टी येथे श्रीदत्त आयसोलेशन सेंटर व १००
बेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते..!
Leave a comment