22 ते 5 मार्चपर्यंतच्या 37 मृत्यूची नोंद
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याची स्थिती विदारक बनत चालली आहे. कडक लॉकडाऊन सुरु असतानाही रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्याही वाढतच चालली आहे. बुधवारी (दि.5) जिल्ह्यात कोरोनाचे नवे 1439 रुग्ण निष्पन्न झाले. तसेच 22 मार्च ते 5 मे या 13 दिवसांतील 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद झाली तर -1140 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात मंगळवारी 4 हजार 192 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 2 हजार 753 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 1439 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 328 रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात 280, आष्टी 71, धारुर 68,गेवराई 130, केज 150, माजलगाव 70, परळी 127, पाटोदा 38, शिरुर 138 व वडवणी तालुक्यातील 39 रुग्णांचा समावेश आहे. तसेच बुधवारी 1140 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मंगळवारी 37 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.यात अंबाजोगाई तालुक्यातील 13,आष्टी तालुक्यातील 2, बीड तालुक्यातील 5,गेवराई तालुक्यातील 3, धारुर तालुक्यातील 1,केज तालुक्यातील 3,माजलगाव 1,परळी 8,वडवणी 1 जणाचा समावेश आहे.आता एकूण रुग्णसंख्या 61 हजार 62 इतकी झाली असून आतापर्यंत 53 हजार 311 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण बळींचा आकडा एक हजार 15 इतका झाला आहे.सध्या सहा हजार 736 जण कोरोनाशी झुंज देत असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.
Leave a comment