माजी जि.प. सदस्य पुत्रांसह सहा जण ताब्यात
जिल्हा रुग्णालयातील प्रकार सीसीटिव्हीत कैद
बीड । वार्ताहर
येथील जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने ती नियंत्रित करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधिक्षकांसह कर्मचार्यांना धक्काबुक्की काही तरुणांनी धक्काबुक्की केली. बुधवारी (दि.5) सकाळी हा प्रकार घडता. हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
विवेक रवींद्र फुटाणे, महेंद्र राजेंद्र फुटाणे, नितीन राजेंद्र फुटाणे, पार्थ महेंद्र फुटाणे, नितीन राजेंद्र फुटाणे (सर्व रा.नेकनूर ता.बीड), स्वप्नील अरुण पवार (रा.पंचशील नगर, बीड) व अक्षय विष्णू सानप (रा.एकनाथनगर, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. याठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस हवालदार अनुराधा गव्हाणे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके हे कर्मचार्यांसोबत केंद्रावर दाखल झाले. यावेळी गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न वाळके यांनी केला. यावेळी उपस्थितांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला.यादरम्यान स्वतः पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, त्यांचे अंगरक्षक, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी जखमी झाले. महिला पोलीस हवालदार अनुराधा गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
Leave a comment