आष्टी । शरद रेडेकर 

प्रशासनावर पकड असणे महत्वाचे असते याचा अनुभव तत्कालीन मंञी विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी महाराष्ट्र राज्याला दाखवून दिला.माञ सद्यस्थितीत प्रशासनाची  गडाबड गोधळा सारखी   परिस्थीती  झाली आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रशासनाची अवस्था आंधळ दळतय नी....अशी दिसून येत असल्याने अशीच यंञना सुरु राहिली तर  रसत्यावर मानसे मरतील स्मशानात एका दीवशी कीती आत्यविधी करावे लागतील याचा आंदाज आपण घेऊ शकणार .नाहीत .कोरोनाला आवर घालणे मुश्कील होऊन जाईल यासाठी आतातरी धसांची मदत घ्या राजकारण यात नका मदत पुर्णवसन कार्यात फार गाढा आनुभव आमदार धसांना  आसल्याने राजकारण बाजुला सारुण त्याची मदत घ्या म्हणण्याची वेळ ज्या काही अधिका-यांनी आ.धस यांच्या कार्यकाळात काम केले आहे ते नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवित आहेत.

आ.सुरेश धस यांनी महसूल मंञी असताना उत्तराखंड येथे आलेल्या महाप्रलयावेळी उत्तराखंडमध्ये दाखल होत त्या परिस्थीतीशी दोन हात करत मरण दारात आलेल्या राज्यातील हजारो भाविकांना सोडवून आणण्यासाठी दिवसराञ एक केला.त्यामुळे या भाविकांना जीवदान तर मिळालेच माञ होणारी मानवहानी देखील टळली.त्यानंतर संकटातील ऊसतोड मजूरांना सोडविण्यासाठी कशाप्रकारे यंञना राबविली जाऊ शकते याचा आनुभव देखील  गतवर्षी सर्वांनी पाहिले.53 हजार जनावरांची छावणी चालवून राज्यात आदर्श निर्माण केला.बिबट्याच्या हल्ल्याने दहशतीखाली जगणार्‍या नागरिकांची बिबट्यापासून सुटका केली.यावेळी अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी आ.धस यांची आपत्तीव्यवस्थापनात काम करण्याची पद्धत पाहिली.ज्यामुळे अनेक संकटावर मात करणारी यंञना आणि आ.धस यांचे जणू समीकरणच जुळलेले आहे.मागील आठवड्यातही राञभर जागून रेमडिसीवर उपलब्ध करुन भल्या पहाटे ते तहसिलदार व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी यांना सुपुर्द करुन गंभीर रुग्णांना ते तात्काळ उपलब्ध झाल्याने अनेकांना जगण्याची नवी उमेद त्या निमित्ताने मिळाली.परंतु सद्यस्थितीत प्रशासकीय यंञना अक्षरशः गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चिञ तालुक्यात निर्माण झालेले आहे.कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची आठ आठ दिवस तपासणी होत नाही,कोरोनाग्रस्त रुग्ण बिनधास्तपणे गावागावात फिरताना दिसत आहेत.अन्टीजन टेस्टचे किट काही खाजगी लबवाल्यांना कसे मिळतात हे कळत नाही.त्यामुळे अन्टीजन टेस्टच्या माध्यमातून पाझीटिव्ह,निगेटिव्ह रिपोर्ट या लबवाल्यांकडून मिळत असल्याने अशा रुग्णांची सरकारी दफ्तरी नोंद होत नाही.त्यामुळे या परिस्थीतीला आटोक्यात आणण्यासाठी आपत्तीव्यवस्थापनाचे गाढे अभ्यासक आणि अनुभव असलेले आ.सुरेश धस यांची तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने मदत आणि मार्गदर्शन घेतले तर वाढती कोरोनाची आकडेवारी 15 दिवसात आटोक्यात येईल असा विश्वास अनेक निवृत्त आणि सध्या प्रशासनात विशिष्ट पदावर असलेले अधिकारी-कर्मचारी बोलून दाखवित आहेत.कारण कोरोनाच्या महामारीत नागरिकांना आवाहन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये सकारात्मकता आणण्याचे काम फक्त सुरेश धस हिच व्यक्ती करु शकते असे अनेकांचे म्हणने आहे.वेळप्रसंगी अधिका-यांशी जितके गोड तितकेच आक्रमक होऊन काम करुन घेण्याची हातोटी हि आ.धस यांना पारंगत आहे.त्यामूळे आ.धस हे जर या लढाईत अजून आक्रमकपणे रस्त्यावर उतरले तर निश्चितपणे याचा फायदा आष्टी मतदारसंघाबरोबरच जिल्ह्याला झाल्याशिवाय राहणार नाही असेही जाणकार बोलून दाखवीत आहेत.किमाण आतातरी राजकीय जोडे बाजूला ठेऊन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकञ येऊन आ.धस यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या नियोजनाने काम केल्यास कोरोना आटोक्यात येण्यास फार मोठी मदत होईल.

 

आष्टी शहरातील लोकनेते आ.सुरेश धस यांनी आयटीआय येथील शासकीय कोवीड सेंटरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास भेट देऊन तेथील सद्परिस्थीतीचा आढावा घेतला.कोरोना बाधीत रुग्ण तसेच या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टर,नर्स,वार्डबॉय, साफसफाई कामगार यांच्याशी चर्चा करुन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले.यावेळी इमारत व परिसर स्वच्छता,जेवण व्यवस्था,पाणीपुरवठा व्यवस्था याबाबत लोकनेते आ.सुरेश धस यांनी समक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांना सुचना व त्यांचे मनोधैर्य वाढवले...!

शहरातील कोवीड सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थीतीचा आढावा घेत.या ठिकाणी काम करत असलेल्या नर्सिंग,वार्ड बाॅय स्टाफ यांच्याशी चर्चा करुन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले.तर अंबाजोगाई येथील लोहीया यांच्या मानवलोक संस्थेने आ.सुरेश धस यांच्या विनंती वरुन आष्टी नगरपंचायतकडे कोवीड सेंटरसाठी 50 बेड व 100 गादीचे नियोजन केले.यावेळी हे साहित्य आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आले....!

कोरोना जनजागृती ,अँटीजन टेस्ट आवाहन

 

 

 

आष्टी,पाटोदा,शिरूर संपूर्ण मतदारसंघात अॅन्टीजन कॅम्प घेणार आहोत त्याला प्रतिसाद द्या. भाजपा व धस कुटुंबीय या संकटकाळात कायम आपल्यासोबत असल्याचे सांगत गावक-यांना धीर देत आधार दिला जनजागृती केली...!

 

 

रेमिडिसीव्हर न मिळायला आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर व सरकारच्या पुळचट धोरणांवर आ.सुरेश धसांचा कडाडून प्रहार..!

 

 

 

कडा शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांना सतर्क राहून शहरात विनामास्क फिरणारांवर कारवाईचा बडगा उचला,दंडात्मक कारवाई करा याच बरोबर सर्वांनी अॕन्टीजन टेस्ट आणि कोरोना लस घेण्याचे आवाहन करताना आ.सुरेश धस

 

 

 

आ.सुरेश धस यांच्यासह सर्व व्यापा-यांच्या एकजूटीचा विजय.....

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.