वैद्यकीय वगळता अन्य सेवाही बंद
शनिवार, रविवारी मात्र सकाळी 7 ते 11 सूट
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवीन आदेश काढले आहेत. आज मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून तीन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. केवळ वैद्यकीय सेवा आणि पेट्रोलियम वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. शनिवार, रविवार (दि.8 व 9 मे रोजी सकाळी 7 ते 11 ही वेळ पुर्वीप्रमाणे संबंधित अन्य अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार बुधवार, गुरुवार व शुक्रवार (दि.5 मे, 6 मे व 7 मे 2021) या दिवशी सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनीक,लसीकरण केंद्रे,वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दु .12 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील. शनिवार व रविवार रोजी (दि.8 व 9 मे 2021 ) या दिवशी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापना (किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित इ.) केवळ 7 ते 11 या वेळेत चालू राहतील.शनिवार व रविवार रोजी (दि.8 व 9 मे 2021) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायंकाळी 5 ते रात्री 7 या वेळेत करता येईल.सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे आदेशात म्हटले आहे.
Leave a comment