बीड | वार्ताहर
लॉकडाऊन कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी सूट दिलेली आहे. मात्र त्यानंतर अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. मात्र आता आज दि.3 मे पासून विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 10 पथके नियुक्त करण्यात आल्याचे आदेश बीड तहसीलदार शिरीष वमने यांनी रविवारी काढले आहेत.
कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत बीड जिहल्यात 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला असुन सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत फक्त अत्यावश्क सेवा चालु ठेवण्यात आलेली आहे.पंरतू प्रशासनाच्या अश्या निदर्शणास आले आहे कि , सकाळी 11 नंतर ही काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत.यामुळे कोविड 19 साथरोगाचा प्रादुर्भावात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे.त्यामुळे विनाकारण फिरणा - या नागरिकांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात येवून योग्य ती कार्यवाही करण्यास्तव बीड शहरात एकुण 10 टिम कार्यान्वित करण्यात येत असुन सदरील टिमने सकाळी 11 च्या नंतर विनाकारण फिरणा - या नागरिकाची अॅन्टीजन टेस्ट करण्यासाठी सोबत च्या प्रपत्रानुसार प्रयोगशाळा तज्ञ , आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांची टिम कार्यान्वित करण्यात येत आहे.सदरील टिमने दिलेल्या ठिकाणी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत कार्यान्वित राहुन योग्य ती कार्यवाही करावी.तसेच सदरील मोहिम आज दि.3 मे पासुन पुढील आदेशापर्यंत राबविण्यात यावी.तसेच सदरील टिम साठी सर्वं आवश्यक साहित्य पुरविण्याची जबाबदारी धोंडरे पी डी प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिल्हा हिवताप कार्यालय बीड यांची राहिल.तसेच मोहिमेचे सनियंत्रण व पर्यवेक्षण पण त्यांनी पहावे.तसेच सदरील टिमसाठी चारचाकी वाहनाची सोय शेख जाफर आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड यांनी करावी.सदरील मोहिमेस कोणीही दुर्लक्ष अथवा हजगर्जीपणा केल्यास संबधितावर योग्य ती प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल , याची गांभियाने नोंद घ्यावी असे आदेश बीड तहसीलदार शिरीष वमने यांनी जारी केले आहेत.
Leave a comment