जातेगाव । वार्ताहर

तालुक्यातील तलवाडा ठाणे हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी (दि.1) एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर व तोंडावर मारहाण जखमांचे व्रण आढळून आले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा खून झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी रविवारी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, खुनाचे रहस्य कायम असून पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत.
ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (32,राग़ोळेगाव ताग़ेवराई) असे मयत तरुणाचे नाव आहे. भटक्या समाजातील काही कुटुंबे गोळेगाव येथे पाल ठोकून राहतात. यातीलच ज्ञानेश्वर चव्हाण याचा मृतदेह शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात आढळून आला.त्याच्या चेहर्‍यावर जखमा व गळ्याला व्रण आढळले. त्याचा खून झाल्याचा आरोप आई व पत्नीने केला आहे.माहिती मिळाल्यानंतर तलवाडा ठाण्याचे सहायक  पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पोलीस अंमलदार कृष्णा वरकड,रामेश्वर खंडागळे यांच्यासी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी   तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाल्याचे उघड झाल्याने मयत ज्ञानेश्वर याची आई मानाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गावातीलच एका संशयितावर गुन्हा नोंद झाला. दरम्यान मयत ज्ञानेश्वर हा पालावर कुटुबासमवेत होता. गुरुवारी त्यास राजापूर येथील एका तरुणाने दुचाकीवर बसवून नेले, त्यानंतर ज्ञानेश्वर घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह राजापूर शिवारात आढळून आला.त्यास दुचाकीवरुन बसवून नेणार्‍या तरुणाभोवतीच संशयाची सूई आहे. त्याच्या अटकेनंतर खुनाचा उलगडा होणार आहे असे सहायक निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.