बीड । वार्ताहर

जिल्ह्यात  रविवारी (दि.2) 1345 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 56 हजार 868 इतकी झाली आहे. 1091 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.तसेच आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा 948 इतका झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी 1 हजार 512 नव्या बाधितांची भर पडली होती तर 1035 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते.शिवाय 28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. शनिवारी 4 हजार 79 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यापैकी दोन हजार 734 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एक हजार 345 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 338 रुग्ण आढळले. अंबाजोगाई 192, आष्टी 60,धारुर 62,गेवराई 183,केज 148,माजलगाव 65, परळी 106,पाटोदा 48,शिरुर 104,वडवणी तालुक्यातील 39 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सहा जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात युसूफवडगाव (ता.केज) येथील 60 वर्षीय पुरुष, शिरुर येथील 60 वर्षीय महिला, मनुबाई जवळा (ताग़ेवराई) येथील 60 वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील खडकत येथील 70 वर्षीय पुरुष, भतानवाडी (ता.अंबाजोगाई) येथील 80 वर्षीय पुरुष, बीडमधील खंडेश्रवरी रोडवरील 45 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एकूण बळींची संख्या 948 इतकी झाली असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.

अंबाजोगाईत शनिवारी 22 कोरोना बाधितांचा मृत्यू

शनिवारी अंबाजोगाईत 22 बाधित रूग्णांचा मृत्यू झाला.1 मे रोजी अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात 18 तर लोखंडी सावरगाव येथील कोविड रूग्णालयात मध्ये 4 असे एकूण 22 रूग्ण मयत झाले असून त्यांच्यावर शनिवारी सायंकाळ पर्यंत टप्या-टप्याने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती संबंधित यंञणेकडून प्राप्त झाली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.