आष्टी । वार्ताहर
शहरालगत असणार्या भिमनगर कुरेशी मोहल्याला खेटुन असणा-या तलवार नदीचे खोलीकरण रुंदीकरण व सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांच्या हस्ते व आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद आनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून भूजल अभियान अंतर्गत नदी खोलीकरण,रुंदीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी 9वाजता संपन्न झाला.
अनेक वर्षापासून आष्टी येथील जल वाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी तलवार नदी वेड्याबाभळी आणि काहींनी आतिक्रमाने गाळामध्ये पूर्णपणे भरल्या गेल्याने तिचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते त्यामुळे शहरातील सर्व व्यापार्यांनी,गोरगरीब मजुरांनी मिळुन 4लक्षरुपये जमा केले येथील नागरिकांनी लोकवर्गणी करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा संकल्प केला. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडून 40 लाख रूपये मिळाले. आष्टी गावातील नागरिकांनी 4 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा केले आष्टी येथील गावकर्यांनी आपल्या गावची जलवाहिनी तलवार नदीचे खोलीकरण व रुंदी करणाचे काम हाती घेतले असून, या कामाचा शुभारंभ बुधवारी 28एप्रील रोजी गावलगतच्या भिमनगार,कुरेशी मोहल्याच्या लगत आसलेल्या पुलाजवळ करण्यात आला. हे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरणा अभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी यंदा तर 300 ते 400 फुटावर गेली आहे.ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील आष्टी येथील गावकर्यांनी आपल्या गावाची नदी खोलीकरणाचा निर्णय घेतला.
यात गावातील नगर आध्यक्ष नगर सेवक, व इतर,कार्यकर्त्यांनी यांनी गावात फिरून गावक-यांकडून या कामासाठी साधारण चार लाखाची लोकवर्गणी जमा केली. याशिवाय नाम फाऊंडेशन यांच्या कडून 40लाख मिळणार आहेत. कामाचा शुभारंभ गावाजवळील तलवार नदीत करण्यात आला. यावेळी आमदार धस म्हणाले, तलवार नदीखुलीकरण, रुंदीकरण, सुशोभिकरण कामासाठी मदत करणार्या ग्रामस्थांचे आभार मानतो. तसेच नामा फाऊडेशनचे नाना पाटेकर व मकरंद आनासपुरे हे माझे खास मिञ आहेत.इतर गावातील नदीच्या खुलीकरणासाठीही नाम फाऊडेशनकडून निधी प्राप्त करणार आहे तसेच नदी सभोवातालचे अतिक्रमणे देखील हटवणार आहे. या कामासाठी या भागातील नागरीकांनी सहकार्य करावे.यावेळी माजी नगर आध्यक्ष रंगनाथ धोंडे महेश शिंदे जेष्ठ नेते मामु शैलेश सहश्रबुद्धे ,सुनील रेडेकर,बाळासाहेब घोडके,आँड आविनाश निबाळकर नगरंचायतचे प्रेमकुमार म्हस्के,दिलीप निकाळजे,राजु देशमुख, सय्यद शफीभाऊ, किशोर धोंडे,दाऊद सय्यद ,सलिम कुरेशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment