आष्टी : प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य पार पाडीत आहेत.तालुक्यातील आंभोरा व पांढरवाडी येथे जिल्हा बंदी ची तपासणी करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान सावरगावचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी बुधवारी जेवण व आरोग्य सु5दिल्या. अंभोरा चेक नाक्यावर तसेच पांढरवाडी चेक पोस्ट व धामणगाव येथील पेट्रोल पंपावर ,आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हाबंदी चेक नाक्यावर कर्मचाऱ्यांना साबण, शनिटायझर, उपरणे, व मच्छिंद्रनाथ संस्थानच्या वतीने लापशी व मसाले भात प्रसाद खाऊ घातला यावेळी पोलीस कर्मचारी विलास माळी, सय्यद अब्दुल, होमगार्ड हंबर्डे भरारी पथक सदस्य बा .म.पवार ,बाबासाहेब मुळीक संतोष दाणी, शिवाजी आव्हाड आरोग्य कर्मचारी रमेश उगलमुगले डॉ शहाजी मोरे शिवाजी जाधव ,सुभाष लांडगे, अंबादास मस्के ,खान शफिक, सामाजिक कार्यकर्ते राजीव लोखंडे तसेच विश्वस्त अनिल मस्के कर्मचारी गणेश भगत आदी उपस्थित होते
01
Apr
Leave a comment