लोकप्रश्नच्या वृत्ताची दखल
नांदुरघाट । वार्ताहर
केज तालुक्यातील नांदुर घाट येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य अधिकारी यांची जागा रिक्त असल्याची मागणी मोठ्या प्रमाणे मध्ये दिसून येत होती. गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये ही जागा रिक्त होती. त्यानंतर दैनिक लोकप्रश्नचे प्रतिनिधी श्रीकांत जाधव यांनी याबद्दल सविस्तर बातमी दिली. लोकप्रश्न च्या या बातमीची दखल घेत 13 दिवसाच्या आत आरोग्य यंत्रणेने या वृत्ताची दखल घेतली. 26 एप्रिल रोजी आरोग्य अधिकारी कृष्णकांत मुंडे हे नांदुर घाट ग्रामीण रुग्णालय येथे सेवेमध्ये रुजू झाले. त्यानंतर परिसरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनी व ग्रामस्थांनी दैनिक लोकप्रश्न व आरोग्य प्रशासनाचे आभार मानले. अशा महत्वपूर्ण काळामध्ये दैनिक लोकप्रश्नच्या बातमीची दखल घेतल्याबद्दल दैनिक लोकप्रश्न परिवाराचे नांदूर घाट परिसरातून आभार मानले जात आहेत.
Leave a comment