कडी नदी खोलीकरण कामाचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील कडा येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातुन भूजल अभियान अंतर्गत नदी खोलीकरण,रुंदीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ रविवारी आ.सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक वर्षापासून कडा येथील जल वाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी कडी नदी वेड्याबाभळी आणि गाळामध्ये पूर्णपणे भरल्या गेल्याने तिचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते त्यामुळे कडा येथील नागरिकांनी लोकवर्गणी करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा संकल्प केला. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशन कडून 40 लाख रूपये मिळाले व कडा गावातील नागरिकांनी 4 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील गावकर्यांनी आपल्या गावची जलवाहिनी कडी नदीचे खोलीकरण व रुंदी करणाचे काम हाती घेतले असून, या कामाचा शुभारंभ रविवारी दि.25 रोजी गावलगतच्या मौलाली बाबा दर्गा येथून करण्यात आला. हे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरणा अभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी यंदा तर 300 ते 400 फुटावर गेली आहे.ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील कडा येथील गावकर्यांनी आपल्या गावाची नदी खोलीकरणाचा निर्णय घेतला. यात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांनी गावात फिरून गावक-यांकडून या कामासाठी साधारण चार लाखाची लोकवर्गणी जमा केली. याशिवाय नाम फाऊंडेशन यांच्या कडून 40लाख मिळणार आहेत. कामाचा शुभारंभ गावाजवळील कडी नदीत पोकलॅण्ड मशीनची पूजा ज्येष्ठ नागरिक गोरख कर्डीले, संजय ढोबळे पाटील यांच्या हस्ते करून करण्यात आला.या वेळी सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच संपत कर्डीले, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे,योगेश भंडारी,गोरक्षनाथ कर्डीले, कुशाभाऊ देशमुख, बंटी गायकवाड, परमेश्वर कर्डीले, सचिन शिंदे,,बाळासाहेब कर्डीले,रमेश देशमुख, राजू गावडे,सुनील अष्टेकर, प्रवीण बहिर,सुमित भंडारी,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment