चौसाळा येथे 125 खाटांचे कोव्हिड सेंटर सुरू

चौसाळा । वार्ताहर

समाज कार्यामध्ये सदैव तत्पर असणारे चौसाळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य मा. अशोक शेठ लोढा यांनी श्री. गुरुगणेश मिश्री जैन प्रतिष्ठान चौसाळा च्या माध्यमातून कै. चांदमलजी लोढा प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे  चौसाळा व परिसरातील नागरिकांची होणारी हेळसांड पाहून रुग्णाची सोय व्हावी यासाठी कै .चांदमालजी लोढा  र्लेींळव-19 चे सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये रुग्णांना राहण्याची, औषध उपचाराची, तसेच भोजनाची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी सेंटरची पाहणी केली असता, त्यांनी लोढा साहेबांचे कौतुक केले कारण रुग्णांची होणारी सोय ही अतिशय उत्तम प्रकारे केली असून, चौसाळा  परिसरातील रुग्णांची होणारी हेळसांड ही थांबणार आहे. तसेच आमच्या कडून तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत आम्ही आपणाला देऊ असेदेखील आश्वासन दिले आहे. तसेच या सेंटरमध्ये रुग्णांना सोय देण्यासाठी,  आरोग्य अधिकारी तसेच वॉर्डबॉय नर्स, सफाई कामगार यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. चौसाळा चे युवा नेते नितीन शेठ लोढा तसेच नेकनूरचे जिल्हा परिषद  सदस्य भारत बप्पा काळे,प्रेमचंद लोढा  हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. डॉक्टर खाकरे ,डॉ .मंचुके ,डॉ . अंजनवतीकर, डॉ .शेडगे,डॉ . हावळे, डॉ .निनाळे ,डॉ. विश्र्वेकर, डॉ .पोथरकर, चंद्रकांत देशमुख, चंद्रसेन गुंजाळ, भीमराव विधाते, बिबीशन मुळे,, भारत चौधरे ,भाऊ जाधव ,पत्रकार बांधव तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.