दोन दिवसांपूर्वीच 500 इंजेक्शन उपलब्ध
बीड । वार्ताहर
जिल्ह्यामध्ये रेमडीसीवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची विनंती केली त्यानुसार आता 2800 रेमडेसिवीर उपलब्ध होत असून आज 1200 आणि उद्या 1600 इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. क्षीरसागर यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.दोन दिवसांपूर्वीच 500 इंजेक्शन बीडला पोहच झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.एकाच महिन्यात दस पट रुग्ण संख्या आढळत आहे. अशा परिस्थितीत जनतेला काळजी घेण्याबाबत आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आरोग्यमंत्री,जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शने शिल्लक नसल्याचे अनेकांनी फोन करून सांगितल्यामुळे दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधला तेव्हा तात्काळ 500 इंजेक्शन उपलब्ध करून दिली तर शनिवारी देखील पुन्हा 5 हजार इंजेक्शने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पुरवठ्यानुसार नक्कीच इंजेक्शन साठा उपलब्ध होईल काळजी करू नये सध्या तातडीने 2800 इंजेक्शन उपलब्ध करून देऊ असे म्हणून आरोग्य मंत्रीटोपे यांनी इंजेक्शन पुरवण्याचे आदेश दिले त्यानुसार आजच 1200 इंजेक्शन उपलब्ध होत आहेत तर उद्या पुन्हा 1600 इंजेक्शन मिळणार आहेत.बीड जिल्हयातील आणि मतदार संघातील जनतेने प्रशासनाचे नियम पाळून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a comment