रेमडेसिवीरची कृत्रिम टंचाई होणार नाही
याची प्रशासनाने दक्षता घ्यावी-खा.डॉ.प्रितम मुंडे
बीड । वार्ताहर
कोरोना योद्ध्यांना साहित्याचा पुरवठा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संघटना राजकीय पक्ष सेवाभावी वृत्तीतून काम करणार्या संस्था व व्यक्तींनी या महामारीला रोखण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून 1 हजार पीपीई किट आज खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
यावेळी खा.डॉ.प्रितमताई म्हणाल्या कि कोव्हीडच्या महामारीत भारतीय जनता पार्टीने सातत्याने सर्वसामान्य माणसांना मदत करण्याची भूमिका निभावली आहे व आजही भाजपाचे कार्यकर्ते मदतीसाठी कार्यरत आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट सेवाकार्य करण्यात आले. अन्नदान, धान्य व किराणा साहित्य वाटप , आरोग्य शिबीर यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून थेट सामान्य माणसांना मदत करण्याचे काम केले गेले. आज त्यांच्याच वतीने 1 हजार पीपीई कीट आरोग्य विभागाला देण्याचे काम होत आहे. आजपर्यंत सर्वच स्तरातून कोरोना महामारी रोखण्याचे काम होत आहे. याकामी जिल्ह्यातील सामजिक भान व जान असणार्या लोकांचे योगदान फार मोठे आहे. मी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोव्हीड सेंटरला भेटी दिल्या या भेटीदरम्यान आरोग्य सुविधांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्या प्रत्येक ठिकाणी सुधारण्याच्या सूचना दिल्या. काही कोव्हीड सेंटरमध्ये अतिशय गलथान कारभार असल्याचे चित्र समोर दिसून आले. या संदर्भात सर्व माहिती मा.जिल्हाधिकारी यांना देऊन तात्काळ उपाययोजना करणे बाबत मागणी करणार आहे. चुकीचे काम करणार्यांवर कडक कारवाईचा आग्रह धरणार आहे. विशेषतः रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार जिल्ह्यातही चालू आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल व आर्थिक लुट चालू आहे. रेमडेसिवीर कृत्रिम टंचाई निर्माण करू नये यासाठी जिल्हाधिकारी व आरोग्य प्रशासनाने सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भगीरथदादा बियाणी, विक्रांत हजारी, प्रा.देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, स्वप्नील गलधर, अजय सवाई, डॉ.लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, संग्राम बांगर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष सोहनी, प्रमोद निणाळ, पिंगळे , बद्रीनाथ जटाळ, अमोल वडतिले, संदीप उबाळे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
गेवराईत नविन कोवीड सेंटरचा
खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ
सध्या बीड जिल्ह्यात कोवीड रूग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे जनतेने स्वतःहाची आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे तसेच कोवीड लसीकरणचे जास्तीत जास्त डोस जिल्ह्यला मिळावेत म्हणून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. रविवार ता. 18 रोजी येथील
उपजिल्हा रुग्णालयातील नविन कोवीड सेंटरचा खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, डॉ.चिचोलीकर ,डॉ.राजेश शिंदे, डॉ.कदम, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,सभापती दिपक सुरवसे,भाजपा उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब गिरी,जे.डी.शहा यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ.लक्ष्मण पवार म्हणाले की गेवराई तालुक्यातील रूग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आपण सुध्दा प्रयत्न करत तसेच कोवीड रूग्णांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक तो निधी देणार आसल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रात कोवीडची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत अशा अनेक तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील कोरोनो रूग्णांचा खा.प्रितमताई मुंडे स्वतःहा आढावा घेत आहेत. त्या अनुषंगाने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातच आणखी एक नविन कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
Leave a comment