आष्टी । वार्ताहर
पांढरी येथे जामखेडहून अहमदनगरकडे जाणार्या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली.यामध्ये पांढरी येथील एक तरुण जागीच ठार तर जामखेड येथील तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.15 दुपारी घडली. घटनास्थळी आष्टी पोलिसांची धाव घेऊन जखमींना आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पांढरी नजीक जामखेडवरुन अहमदनगरकडे जाणार्या चारचाकी क्रमांक (एम एच.12 क्यू. टी. 7848 )या वाहनाने दोन दुचाकीस्वाराना जोराची धडक दिली असता यामध्ये पांढरी येथील पोपट छगन शिंदे (32) हा तरुण जागीच ठार झाला असून दुसर्या दुचाकीवरून जामखेड येथील येथील गणेश काळे,जयश्री गणेश काळे, एक लहान बाळ हे तिघे गंभीर जखमी आहेत.त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारचाकी चालक हा मद्यधुंद अस्वस्थेत गाडी चालवत होता असे आढळुन आले आहे. घटनास्थळी आष्टी पोलीस स्टेशनचे पो.कॉ.सचिन कोळेकर यांनी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment