जिल्ह्यात 963 नवे रुग्ण; 559 जण कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने जिल्हा विळख्यात घेतला आहे. गुरुवारी (दि.15) जिल्ह्यात आणखी 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुर्देव हे की, यात बीडमधील दहा वर्षीय मुलाचाही समावेश आहे. मृत्यूसंख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच दिवसभरात 963 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
जिल्ह्यात गुरुवारी 3 हजार 799 जणांच्या तपासणीचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. यामध्ये 2 हजार 836 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 963 नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 230 रुग्ण आढळले. आष्टी 116, बीड 167, धारुर 25, गेवराई 49, केज 106, माजलगाव 70, परळी 69, पाटोदा 59, शिरुर 43 तर वडवणी तालुक्यात 29 नवे रुग्ण आढळून आले. तसेच 559 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान गुरुवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात, बीड शहरातील 61 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, राक्षसभूवन (ता.शिरुर) येथील 65 वर्षीय पुरुष व आष्टी शहरातील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 35 हजार 952 इतकी झाली असून 31 हजार 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर एकूण मृत्यूसंख्या 734 झाली आहे, अशी माहिती सीइओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
Leave a comment