गेवराई । वार्ताहर
कोरोनो महामारीने पुन्हा डोके वर काढले असून, जनतेने आपली व आपल्या परिवाराची काळजी घेऊन लस टोचून घ्यावी. तसेच, सरकार आणि प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवहान आ.लक्ष्मण पवार यांनी येथे केले आहे. बुधवार ता. 7 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड विभागाला भेट देऊन पहाणी करून आढावा घेतला.
यावेळी बोलताना आ.पवार म्हणाले, गेवराई तालुक्यात कोरोनो रूग्णांची संख्या वाढू लागले आहे. त्यामुळे आरोग्य आधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहून काम करावे. नागरिकांना काही ञास जानवत असेल तर कोरोना टेस्ट करून घेतली पाहिजे. तसेच 45 वयांच्या व्यक्तीनी कोरोनो लस घेतली पाहिजे लस सुरक्षित असुन लस घेतली तर कोरोनोचा सामना करणे आपल्याला सोपे होईल तरी नागरिकांनी लस घेऊन सहकार्य करावे असे आवहान आ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे. ते म्हणाले की आज गेवराई तालुक्यातील कोरोनोचे एकुण 65 रूग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी कस्तुरबागांधी येथील कोवीड सेंटर येथे 41 रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालयात 24 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे. तसेच गुरुवार पासून भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व दुध वितरीत करणार्यांची लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. फळविक्रेते,दुध विक्रेते, करणारी लस टोचून घ्यावी असे आवहान ही आ. पवार यांनी केले आहे. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरला आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी आज दि.7 एप्रिल बुधवार रोजी दुपारी 12:00 वाजता भेट देऊन तालुक्यातील कोरोनो रूग्णांसोबत उपचाराबाबत उपलब्ध आरोग्य सुविधाचा आढावा घेतला. यावेळी डॉ.चिचोळे, डॉ.राजेश शिंदे, तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. कदम न.प.मुख्यधिकारी उमेश ढाकणे, गटविकास आधिकारी सानप उपस्थित होते.
Leave a comment