जिल्ह्यातील व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक तर
सुरेश धस यांनी लोकडाऊन मध्ये सहभागी न होण्याचे आव्हान
बीड । वार्ताहर
मा. जिल्हधिकारी,बीड यांनी 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करत असताना सामान्य जनता व व्यापारी यांच्या अडचणींचा कोणताही विचार न करता तुंगलखी निर्णय जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक व्यापारी आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहे.
व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे काढलेले आदेश हे जाचक व अन्यायकारक आहेत, असे संतोष सोनी व इंगळे यांनी म्हटले आहे.
सर्व व्यापार्यांनी अॅन्टीजेन टेस्ट करून प्रशंसनास सर्वतोपरी सहकार्य केलेले असताना पण व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता तडकाफडकी लोकडाऊन जाहीर करून प्रशासनाने व्यापाऱ्यांची घोर कुचंबणा केली आहे.
अन्यथा..............................
कोरोना संसर्गामुळे पूर्ण जगाला वेढून घेतले होते आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागु करण्यात आले होते. कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावुन एक वर्ष उलटले आहे. परंतु अजुनही लॉकडाऊन पुर्णपणे बंद झालेले नाही. या लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन प्रशासन आपली तिजोरी भरत असले तरी गोरगरीब जनता मात्र उपासमारीने मरत आहे. तसेच सध्या कोरोनाची लस बाजारात आली आहे असे असताना देखील लॉकडाऊन लावणे योग्य नाही. यामुळे देशातील नागरिक, युवा पीढी येणाऱ्या काळात पागल होऊन देशभरात पागलपणाची लाट नक्कीच येणार आहे. या लाटीवर मात्र प्रशासन आणि सरकारला कोणतीही लस बनविणे शक्य होणार नाही. मग आता लॉकडाऊन लावुन आपल्या जबाबदारीपासून पळ काढणारे सरकार व प्रशासन काय करणार ? असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.
एक वर्ष जाणे म्हणजे सर्व व्यावसायिकांचे कंबरडे मोडणे आहे. शासनाचे निर्णय कुठेतरी चुकतात. पण ते त्यांना समजतं नाही किंवा समजुन घेण्याची इच्छाशक्ती नाही. आरोग्य विभागाने आपल्याला सुविधा द्याला पाहिजे किंवा पुरवायला अशा पद्धतीने निर्णयघ्यायला पहिजे. या अगोदर कोरोना च्या परिस्थिती मध्ये भारता किंवा राज्य मध्ये लोकांच्या मारण्याचं प्रमाण होत आणि तेच आहे पण फरक इतकाच आहे की पूर्वी मरताना लोक मोजले जात नसे आणि आता मेलेल्या लोकांची संख्या मोजली जात आहे. मृत्यु दरात वाढ कुठे आहे हे दिसत नाहीये. रोग आहे त्याची काळजी घ्यायला सर्व काही करायला पाहिजे पण मृत्युदरात वाढ होत नाहीये. एखाद्या वेळेस व्यवसायिकांचे भागवेल पण जे लोक रोज कमवतात तेंव्हाच त्यांना रात्री जेवयला मिळेत अशा गरीब लोकांचं काय ? याचा विचार शासनाने लॉकडाऊन लावण्याआधी करायला हवा. तसेच दोन दिवसात लॉकडाऊन लावल्या मुळे कोरोना पुढे जाईल का ? दोन दिवस लॉकडाऊन काय होणार ? चाचण्या करायला पहिजे. पोलिओ लसीकरणाची मोहीम जशी चौका चौकात चालविली जाते तशी कोरोना ची लस का नाही ?
कोरोनामुळे जरी सध्या स्पर्धा परिक्षा होऊ शकल्या नाहीत तरी मागील दोन वर्षा पासून भार्ती झालेली नाही. दोन वर्षांपूर्वीजी भर्ती झाली होती त्यातील ७० ते ८० हजार लोकांची मिळालेले जे जॉब होते त्याचे फक्त लेटर मिळालेलं आहे. प्रत्यक्षात नोकरी मिळालेली नाही. सध्या राज्यात पोलिस भर्ति मध्ये ३३ हजार जागा रिक्त आहे. आरोग्य विभाग मध्ये बघितलं तर १५ ते १८ हजार जागा रिक्त आहेत, महसुल विभागात ९ हजार जागा रिक्त आहेत. तसेच केंद्र सरकारच्या १ लाख रेल्वे च्या जागा रिक्त आहेत. तेथे सुद्धा कोणतेही हालचाल नाही. सामान्य व्यक्ती साठी शिक्षण हे एक मूलभूत हक्क आहे. पहिली गोष्ट म्हणजे चौथी व पाचवीचे जे मुले आहेत ते घरात बसून बसून पागल झाले आहेत घरी बसून मुलांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज कोरोना ची लाट आहे उद्या पागलपणाची लाट येणार आणि भारता मध्ये तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये लोक पागल सारखे रस्त्यावर येतील.
खरे म्हणजे तर भारत हा युवकांचा देश आहे. यावरच भारताची अर्थव्यवस्था चालते. महाराष्ट्र अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू त्याचं मुख्य कारण म्हणजे युवक आहे. त्यामुळे युवकांच्या समस्या समजून घ्याल पहिजे. युवकांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे शिक्षणावर राज्याचं विकास समजून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. आज अश्या लाखो बिल्डिंग आहेत त्या मध्ये रुग्णालयात उघडुन तेथे डॉक्टर उपलब्ध करुन तेथील समस्या सोडल्या जाऊ शकतात. आरोग्य विभागाची सेवा उपलब्ध करुन त्यावर उपाय केला जाऊ शकतो. आणि दवाखाणे नाही भेटले म्हणून लॉकडाऊन हे केले जात आहे बाकी काही त्याचे मुख्य काही मोठे कारण नाहीं आणि लॉकडाऊन लावले तर कोरोना थांबेल का ? या सर्व गोष्टी वर लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. सरकारी नोकरी करणाऱ्या विद्या्थ्यांना वयाच्या सोळव्या वर्षी व वयाच्या तिसाव्या वर्ष पर्यंत नोकरी कऱ्यण्याची वय मर्यादा असते. लॉकडाउनच्या यासर्व दुष्परिणामांमुळे देशातील नागरिक पागल होत आहे. हे मात्र नक्की असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.
Leave a comment