पाच जणांवर गुन्हा दाखल

 

बीड  | वार्ताहर

 

बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पारगाव जप्ती येथील एका शेतकऱ्याच्या दोन हेक्टर ४३ आर एकर जमिनीवर बनावट दस्ताऐवजाद्वारे कब्जा करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम खटोडसह पाच जणांवर बीड ग्रामीण ठाण्यात मंगळवारी (दि.२३) गुन्हा नोंद झाला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पारगाव (जप्ती) येथील अनंत कडाजी तिपाले (५०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पारगाव (जप्ती) येथील गट क्र.६२ मध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ७ मे १९८५ रोजी त्यांनी चुलत्याकडून १९ एकर पैकी १० एकर चार गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी खतामध्ये दक्षिणेकडील जमीन खरेदी करत असल्याची नोंद आहे. सातबारा उताऱ्यावर तसे नमूद आहे. दरम्यान, चुलते मयत झाल्यानंतर गट क्र६२ मधील ९ एकर जमीन चुलतभावाने विक्री केली. त्यानंतर खरेदीदाराने २ एप्रिल १९९३ रोजी दोन एकर ४३ आर जमीन झुंबरलाल पन्नालाल खटोड यांना विक्री केली होती. दरम्यान, झुंबरलाल खटोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र गौतम झुंबरलाल खटोड यांनी मूळ खरेदीदारांशी संगणमत करुन बनावट चर्तु:सीमा व खरेदीखत तयार करुन दुरुस्तीपत्र केले व फसवणूक केली. यासंदर्भात अनंत तिपाले यांच्या फिर्यादवरुन गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार व इतर तिघांवर बीड ग्रामीण ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.