मुख्यमंत्री कार्यालयाने मांडला वेगळाच मुद्दा

परमबीर सिंग यांच्याविरुध्द अब्रुनुकसानाची खटला दाखल करणार

 

मुंबई । वार्ताहर

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने  राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आले. त्यामुळे या सर्व घटेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याची सर्वत्र चर्चा होत असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

परमवीर सिंह यांच्या नावाने पाठवण्यात आलेला ईमेल नक्की त्यांनीच पाठवला आहे का, याबाबतच सर्वात आधी तपास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

'गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमवीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमवीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परमवीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,' अशी माहिती CMO कडून देण्यात आली आहे.

'वास्तविक पाहता परमवीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते,' असंही मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे हे पत्र जर खरं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याची नक्की कशी दखल घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जातो की त्यांना तपासाअंती क्लीनचिट दिली जाणार, हेदेखील आगामी काळातच स्पष्ट होईल.

 

आपल्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लगेच स्पष्टीकरण दिलं आहे.'स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,' असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला आहे.

 

 

गृहमंत्री अनिल देशमुखांनी मांडली बाजू

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. असे सांगत परमवीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत याकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत.मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी ट्विटर हॅन्डलवर एक पत्रक लिहून आपली बाजू मांडली आहे. त्यात गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले आहे कील सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप लहरीं वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली.हापरमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या लहरींच्या माध्यमातूनपरमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या लहरींवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या लहरीं वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत.याचा अर्थ काय? 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. 
असे सांगत गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की,  पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत.16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत . सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही . एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूया गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमवीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे  मुख्यमंत्री यांनी परमवीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.