आता जिल्ह्याला जाण्याची गरज नाही
आष्टी । वार्ताहर
कडा येथील गांधी हॉस्पिटलचे नुतनीकरण आणि डॉ. गांधी व डॉ. मोहरकर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीत कक्षाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती डॉ. उमेश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कडा येथील गांधी हॉस्पिटल आणि मोहरकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीकरण करण्यात आले आहे. रुग्णांना आता सर्व प्रकारच्या सुविधा कडा येथे मिळणार आहेत त्यामुळे आता उपचारासाठी अहमदनगर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. 1980 पासून कडा येथे गांधी हॉस्पिटल रुग्ण सेवेत आहे. डॉ. अशोक गांधी यांनी 1980 साली कडा व परिसरातील रुग्णांसाठी रुग्ण सेवेला सुरुवात केली. गांधी हॉस्पिटलचे नुतनीकरण आणि डॉ. गांधी व डॉ. मोहरकर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीत कक्षाचे उद्घाटन आ. सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच संपत कर्डीले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अतिदक्षता विभागात ह्दय विकार, सर्पदंश, पक्षाघात, विषबाधा,दमा,उच्च रक्तदाब, अनियंत्रित साखर तसेच ट्रामा आसीयुमध्ये अपघात, डोक्याला इजा, हाडे फ्रॅक्चर इत्यादी वर उपचार केले जातात. तसेच डिजीटल एक्सरे, अल्ट्रा सोनोग्राफी, इसीजी इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन मशिन,पल्स ऑक्सिमीटर, मल्टीपॅरामॉनिटर, व्हेंटिलेटर, डीफीब्रीलेटर, सिरीज पंप, सेंट्रल ऑक्सिजन,अॅम्बुलन्स , सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसुती गृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ विमा धारकांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत असेही डॉ. उमेश गांधी यांनी सांगितले.
Leave a comment