बीड । वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अगळ्या वेगळ्या पद्धतीने ऐतिहासीक साजरा केला जातो. बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फिटतील असे विविध सांस्कृतिक, सामाजिक, कार्यक्रम आ.संदिप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कोव्हिड 19 चे नियम पाळुन साध्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवरायांच्या प्रतिमेची जिल्हाधिकारी राजेंंद्र जगताप, पोलीस अधिक्षक आर.राजा, जि.प.चे मुख्याधिकारी अजीत कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, तहसीलदार भेंडे, वमने, अतिरीक्त पोलीस अधिक्षक लांजेवार, डीवायएसपी वाळके, शिवजयंतीचे अध्यक्ष मुकुंद भोसले, उपाध्यक्ष परवेज देशमुख व शिवप्रेमींच्या उपस्थितीत शासकीय पुजन व अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. 


बीडमध्ये आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चंपावतीनगरी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2021 च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेता आले नाही. दरवर्षी विविध सांस्कृतिक व देशभरातील कलाप्रकार बीडमध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीडकरांना पहावयास मिळतात. याही वर्षी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी शिवप्रेमींची इच्छा होती. परंतू कोरोनाचे वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कोव्हिड 19 च्या नियम पाळून साध्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा बीडमध्ये साजरा करण्यात येत आहे.

सकाळी 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकवून जिजाऊ वंदना व इतर कार्यक्रम, शासकीय महापुजन करण्यात आले. यावेळी आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अ‍ॅड.डी.बी.बागल,उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष भरत झांबरे पाटील, प्रा.विजय पवार, भाऊसाहेब डावकर, नखाते, यावर्षीचे सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद भोसले, परवेज देशमुख, नगरसेवक रमेश चव्हाण, हाफीज बागवान, झुंजार धांडे, शेख एकबाल, अशोक रोमण व मान्यवरांसह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येथील शासकीय शिवपुजन इतर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद भोसले, उपाध्यक्ष परवेज देशमुख, सचिव बाळासाहेब चिरके, सहसचिव बाळासाहेब राऊत, सहसचिव, हाफीज बागवान, कुंदन काळे, सहकोषाध्यक्ष सुशिल जाधव, आनंद शेटे, विशाल वाघमारे, गणेश लोंढे, विकास जेथे, अशोक जावळे आदींनी परिश्रम घेतले.

छत्रपती शिवारायांचे विचार प्रेरणादायी-आ.संदिप क्षीरसागर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कार्य प्रेरणादायी आहे. महाराजांचे शौर्य, त्यांची शासन पद्धती, त्यांची युद्धनिती या सर्व बाबी आदर्श असून त्यांना मानाचा मुजरा, महाराजांपुढे मान झुकतेच. दौलत ही क्या मिलेंगी बादशाह के खजानामें, जो मैने पायी हैं छत्रपती के सामने सर झुकानेमें अशा शब्दात आ.संदिप क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत कोव्हिड 19 चे नियम पाळुन शिवजयंती साजरी करावी, कोरोना आणखी संपलेला नसल्याने आपली, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.