केज । वार्ताहर

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी (दि.9) दुपारी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्षष्ट झालेले नाही. 
तेजल संपत चव्हाण (19, रा.भवानीनगर) असे त्या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरात छताच्या पंंख्याला साडीने गळफास घेेेऊन आत्महत्त्या केली.तेेेजलचे आई-वडील हे अहमदनगर येेथे काम करतात. तेजल ही केज येेथे राजूबाई व गणपत चव्हाण या तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. तिचे चुलते हे परळी येथे कंत्राटी पद्धतीने पोस्टात काम करतात. मंगळवारी दुपारी तेजलने तिने घरी कोणी नसताना चुलते विठ्ठल चव्हाण यांच्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजल ही अंबाजोगाई येथील मराठवाडा महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.तिचे माजलगाव तालुक्यातील वानटाकळी येथील नात्यातील तरुणाशी लग्न ठरले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे आणि वैभव राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीचे आजोबा गणपत चव्हाण यांनी दिलेल्या खबरेवरुन केज ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर व मंगेश भोले हे करीत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.