बीड | वार्ताहर
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.५) कोरोनाचे ३३ नवे रुग्ण आढळून आले तर ३० जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान शुक्रवारी एका मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले असून आता हे प्रमाण ९५.७३ टक्के झाले आहे तर मृत्यूदर ३.१० टक्के इतका आहे.
शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ५३६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ३, आष्टी २, बीड २१, धारुर, गेवराई,वडवणी तालुक्यात प्रत्येकी १ तर केज व परळी तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली तर ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले.
आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७ हजार ९८३ झाली असून १७ हजार २१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५५८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख १ हजार ६०८ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील १ लाख ८३ हजार ६२५ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment