बीड नगरपालिकेच्या नियोजनशून्य विकासकामांबद्दल जनतेत संताप

बीड । वार्ताहर

बीड नगरपालिकेची अवस्था आंधळ दळतय अन्...अशी झाली की काय? असा प्रश्न सध्या सुरु असलेल्या विकासकामांवरुन नागरिकांना पडतो आहे. शहरातील काही भागात सिमेंट रोड तयार केल्यानंतर त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे त्यामुळे चांगल्या रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचा नियोजनशून्य कामाचा प्रकार यानिमित्ताने शहरवासियांसमोर आला असून त्याचा फटका रस्त्यावरुन ये-जा करताना वाहनचालकांसह नागरिकांना बसत आहे.


कोणताही रस्ता करण्याअगोदर बाजूच्या नाल्या तसेच पाईपलाईनची काम करावी लागतात हा साधा नियम आहे पण नगर पालिकेच्या अभियंत्यासह सत्ताधार्‍यांना याच्याशी देणंघेणं नसल्याने ही विकास कामे म्हणजे आंधळ दळतंय अन कुत्र पीठ खातयं अशी स्थिती निर्माण करणारे झाले आहेत.पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात गेल्या सहा महिन्यांपासून विकासकामे सुरु आहेत.मात्र ही कामे करताना नियोजनाचा अभाव सातत्याने दिसून येत आहे.
काही ठिकाणी सिमेंट रोडचे काम झाल आहे तर काही ठिकाणी हे काम अंतिम टप्यात आहे.हे काम करण्यापूर्वी या भागात अटल अमृत पेयजल योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम करणे आवश्यक होते; मात्र ज्या गुत्तेदाराला जे काम मिळाले ते पूर्ण करून बिल पदरात पाडून घेण्यासाठी तो थातुरमातुर काम उरकण्याचा प्रयत्न करत असल्याचेचित्र आहे.या कामावर आजपर्यंत तरी नगर पालिकेचा एकही इंजिनियर किंवा अधिकारी फिरकल्याचे दिसलेले नाही. रस्त्याचे काम करताना त्याची जाडी 6 इंच असावी की नऊ इंच,त्याखाली रोडा,मुरूम टाकावा लागतो की नाही हे बघण्यासाठी देखील नगर पालिकेच्या अधिकार्‍यांना वेळ नाही. सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक असोत की विरोधी उपाध्यक्ष अथवा विद्यमान आमदार,कोणालाही शहरातील कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी सारी स्थिती दिसून येत आहे.
महत्वाचे हे की,अनेक भागात तीन इंच,दोन इंच सिमेंट टाकून रोडचे काम गुत्तेदाराने उरकून घेतले आहे.हे काम अत्यंत निकृष्ट असले तरी नसल्यापेक्षा बरे म्हणून लोकही झालेली कामे सहन करत आहेत. वास्तविक नगर पालिकेच्या उलट्या कारभारामुळे झालेल्या कामांचे नुकसान होत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगसेवक याकडे लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.