बीड | वार्ताहर

 

जिल्ह्यात कोरोनामुळे शुक्रवारी (दि.22) आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली तसेच कोरोनाचे 38 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 14 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

 

शुक्रवारी जिल्ह्यात 628 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील 590 अहवाल निगेटिव्ह आले तर 38 बाधित निष्पन्न झाले. यात अंबाजोगाई 10, आष्टी 1, बीड 19, केज 3, माजलगाव 1, परळी 2 व शिरुर कासार तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान शुक्रवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली. त्यामुळे एकुण मृत्यू संख्या 551 झाली आहे. तसेच जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 499 झाली असून यापैकी 16 हजार 716 जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 91 हजार 746 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तब्बल 1 लाख 74 हजार 247 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.