परळी । वार्ताहर
तालुक्यातील धर्मापुरी फाटा येथे पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकावर चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.20) घडली. यावरुन दोघांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
शिवराम देवकर (रा.वडार कॉलनी,परळी) असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. बुधवारी ते धर्मापुरी फाट्यावरील एका गॅरेजमध्ये बसलेले होते. यावेळी रवि शंकर देवकर व प्रदीप शंकर देवकर (दोघे रा.वडार कॉलनी, परळी) हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादाची कुरापत काढून चाकू व काठीने मारहाण केली. यात शिवराम हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरुन देवकर बंधूंवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment