अंबाजोगाई । वार्ताहर
रात्रीच्या वेळी भरधाव जाणार्या खासगी बसने ऑटोरिक्षा जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील तिघे तरूण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि.20) रात्री 11 वाजता अंबाजोगाई लातूर रोडवर सेलू आंब्याच्या टोल नाक्याजवळ झाला. तिन्ही तरूणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गणेश युवराज घोडके (28), सुरज काकासाहेब घोडके (30) आणि आत्माराम वाघमारे (27, सर्व रा. गरसोळी, जि. लातूर) अशी त्या जखमी तरूणांची नावे आहेत. हे तिघे ऑटोरिक्षातून अंबाजोगाईहून गरसोळीला निघाले होते. वाटेत सेलू आंब्याच्या टोलनाक्याजवळ समोरून भरधाव खासगी बसने क्र.(एमएच 30 एफ 6899) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा झाला तर रिक्षातील तिघेही तरूण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
Leave a comment