बीड । वार्ताहर
तालुक्यातील सिरस पारगाव शिवारातील डोमरी नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने अवैध रोडा मिश्रित वाळू उत्खन करुन नंतर तीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून चोरुन नेणार्या तिघांविरुध्द बीड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवारी (दि.19) रात्री 12 वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तीन ट्रॅक्टर, एक जेसीबीसह तब्बल 20 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांनी याबाबत फिर्याद दिली.आत्माराम गोरे (रा.शहाबाजपूर ता.बीड),रघुनाथ घोलप व अर्जुन आडसुळे (दोघे रा.तळेगाव,ता.बीड) यांचा आरोपीत समावेश आहे. डोमरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन नंतर त्या रोडा मिश्रित वाळूची चोरटी वाळू वाहतूक केली जात होती. कारवाईदरम्यान संबंधितांकडे वाळू वाहतूक परवाना आढळून आला नाही. नंतर पोलीसांनी एक विनाक्रमांच्या ट्रॅक्टरसह क्र.(एम.एच.23 एफ 4636), क्र.(एम.एच.29-एससी.8083) हे तीन ट्रॅक्टर तसेच क्र. (एम.एच.23 टी 1721) हे जेसीबी मशीन ताब्यात घेतले.
Leave a comment