माजलगाव । वार्ताहर
शेतकर्याच्या घराच्या दरवाजाला छिद्र पाडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी पहाटे तालुक्यातील पात्रूड येथे घडली.याप्रकरणी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.सहाय्यक फौजदार ऐटवार अधिक तपास करत आहेत.
महेश राजाभाऊ मुंडे (35) यांचेे पात्रूड येथे माजलगाव रोडवर घर आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता मुंडे कुटुंबीय घर बंद करुन झोपी गेले. पहाटे दीड वाजता महेश यांना आवाज आल्याने जाग आली. घराच्या दरवाजाजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना दरवाजाला छिद्र आढळले. त्यांनी शेजार्यांना फोन करुन जागेे केले व घराची पाहणी केली तेव्हा स्वयंपाक घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले. शिवाय घराच्या मागील सीसीटीव्ही कॅमेर्याचे वायरही तोडलेले आढळले. या प्रकरणी त्यांनी माजलगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली.
Leave a comment