केज । वार्ताहर
शहरातील प्रशांतनगरात एका शेतकरी महिलेचे बंद घर चोरट्यांनी फोडले, यात 23 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. गुरुवारी (दि.14) पहाटे ही घटना घडली.
जया प्रवीण काचुळे या शहरातील प्रशांतनगरात राहतात. 13 जानेवारी रोजी त्या घर बंद करुन शेतात गेल्या होत्या. तिकडेच त्या थांबल्या होत्या. इकडे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी गुरुवारी पहाटे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख 2 हजार, 19 हजार 400 रुपयांचे गंठण, चांदीचे करंडे असा एकूण 23 हजार 40 रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment