आणखी तीन दुचाकी लंपास
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात वाहन चोरांची टोळीच सक्रीय झाली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कुठे ना कुठे दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होवू लागले आहेत. यातील एकाही गुन्ह्याचा तपास लागत नसतानाच पुन्हा असेच गुन्हे घडू लागले आहेत. जिल्ह्यात आणखी तीन दुचाकी चोरीच्या घटना शुक्रवारी (दि.15) उघडकीस आल्या. पाटोदा, माजलगाव व गेवराई येथे या घटना घडल्या.
पाटोद्यातील एलआयसी कार्यालयाशेजारील महासांगवी रोडवरुन शिक्षक संतोष रामेश्वर गव्हाणे यांची 30 हजार रुपयांची दुचाकी (क्र.एमएच 23 एएम-9832) चोरट्यांनी 5 जानेवारी रोजी लंपास केली. यावरुन पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दुसर्या घटनेत माजलगाव येथील मंगलनाथ कॉलनीतून 3 रोजी शार्दूल शरद भांडेकर यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एमएच 44 व्ही-2287) चोरट्यांनी पळवली. तिसरी घटना गेवराईत घडली. शहरातील बाजारतळावरुन 12 रोजी विलास खेमा राठोड (रा.राजपिंप्री) यांची 15 हजार रुपयांची दुचाकी (क्र.एमएच 23 एजी-8149) चोरट्यांनी लांबवली. यावरुन गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment