बीड शहर पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ

बीड । वार्ताहर

जिल्हा रुग्णालयातही चोरटे हात साफ करु लागले आहेत. असाच एक प्रकार घडनेच्या पंधरा दिवसासमोर आला आहे. जिल्हा रुग्णालयाच उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 65 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाच्या कानातील 4 ग्रॅम सोन्याच्या बाळी चोरट्यांनी लंपास केल्या. महत्वाचे हे की, याबाबत संबंधिताने बीड शहर ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली खरी, मात्र शहर पोलिसांनी टोलवाटोलवी करत तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलिसांबद्दल रोष आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, वडवणी तालुक्यातील बाबुराव सवासे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सीटीस्कॅन केल्यानंतर न्यूमोनिया असल्याचे समजले. कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवालही कोरोना बाधित असल्याचा आला. त्यांच्यावर कोरोना रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये उपचार सुरू होते. रूग्ण शरिक होताना त्यांच्या कानात बाळ्या होत्या. परंतु नंतर ते बाधित आढळल्याने नातेवाईकांना आत जाण्यास बंदी घातली. 29 डिसेंबर रोजी मुलाने विनंती केल्यावर त्याला आतमध्ये सोडण्यात आले. यावेळी त्यांच्या कानात बाळ्या नसल्याचे समोर आले. त्याने तात्काळ पोलीस चौकीत धाव घेतली. परंतु येथील कर्मचार्‍यांनी ‘तुम्ही तुमचे पहा, ते काम आमचे नाही’, असे सांगून अरेरावी केली. नंतर संबंधिताने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावर येथील जोगदंड नामक पोलिसाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करून परत पाठविले.

जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार देण्यास गेल्यावर येथील शिपायांनी त्यांना भेटच होऊ दिली नाही.त्यामुळे नातेवाईक वैतागले असून याची वेळीच चौकशी करून शोध न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बीड शहरचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांना विचारले असता, या प्रकरणात सर्व माहिती घेतो. याची चौकशी केली जाईल असे उत्तर त्यांनी दिले तर रुग्णाचे नातेवाईक दत्ता सवासे म्हणाले, माझे वडील अ‍ॅडमिट करताना त्यांच्या कानात सोन्याच्या बाळ्या होत्या. नंतर भेटायला गेल्यावर त्या नव्हत्या. पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी तक्रार घेतली नाही. सीएसकडे शिपायांनी जावू दिले नाही. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.