माजलगावातील प्लॅाटधारकाची मागणी
माजलगाव । वार्ताहर
येथील डॉ.सुशीलकुमार बन्सीधरराव सोळंके गट नं. 368 मधील बायपास रोड वरिल प्लॉट नं.13 व 14 मिळकत क्रे. 26/1337 य 24/1315/1 यांच्या चालू असलेल्या फेज न 1 च्या बांधकामात व यापूर्वी बांधकाम झालेल्या फेज न 2 व 3 च्या बांधकामात नियमानुसार अंतर सोडले नसून फेज 2 व 3 च्या रहिवाशांच्या खिडक्या बंद करून हवा व प्रकाश बंद करण्यात येत असल्याने सदर बांधकाम बंद करून कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
डॉ सुशीलकुमार सोळंके यांच्या प्लॉटवर बांधकाम चालु आहे संबंधीत दोन विग बांधकाम पुर्ण केलेले आहे. संबंधितत बांधकाम गोकुळधाम अपार्टमेन्ट फेज-2 व फेज -3 पुर्ण केलेले आहे सद्या फेज 1 चे बांधकाम सहन जागेवर चालु आहे बांधकाम करत असताना फेज 2 व फेज 1 मध्ये कसलेच अंतर ठेवलेले नाही त्यामुळे ऋडख नियमावलीचे कसलेच पालन केलेले नाही त्यामुळे फेज 2 मधील प्लॅट साठी कसलेच हवा व सुर्यप्रकाश येणार नसल्याने बिल्डर्स च्या बांधकामाचे चौकशी करून होणारा दुष्परिणाम टाळावा असा अर्ज रहिवाशांनी दिला आहे.निवेदनावर देशमुख ज्ञानेश्वर नानासाहेब, चिराग किशोरलाल रुपडा, मनिष रामनारायण रवाणी, राठोड सुंदर बाबुलाल, रानपरिया पियुष सुरेश कुमार, मसलेकर मोरेश्वर निधिकांत, जाधव गणेश अंगदराव, कायतवाड राजेंद्र, विठ्ठलराव जाधव, प्रकाश भाईदासराव, शिंदे अजय रामचंद्र आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Leave a comment