बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार 

नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत 

बीड । वार्ताहर

मुगगाव (ता.पाटोदा) येथे 7 जानेवारी 2021 रोजी 11 कावळे मृत स्थितीत आढळून आले. त्यापैकी 3 कावळयांचे शव रोग निदानासाठी, रोग अन्वेषण विभाग,पुणेमार्फत, भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. सदरील नमुने बर्ड फ्लू पाझिटिव्ह आले आहे. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे . यासंदर्भात सर्व पोल्ट्री धारक व सर्व सामान्य जनतेने जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे,पोपट,बगळे, किंवा स्थलांतरीत होणार्‍या पक्षांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यवसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास , तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यास माहिती द्यावी. मृत पक्षास हात लावू नये. शव विच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती , शासनेत्तर संस्था , सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत , पशुपालक ज्यांना नमुद कायद्याशी सलग्न असणार्‍या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजीकच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय दवाखाण्यास लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. बर्ड फ्लूचा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रिक करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.परंतू अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षीत आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

अशी आहे परिस्थिती

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, केरळ , मध्यप्रदेश , राज्यस्थान या राज्यांतील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे.तसेच महाराष्ट्रामध्ये देखिल काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत  त्यासंदर्भात विविध माध्यमांना याबाबतीतील अद्यावत अधिकृत माहिती देणेसाठी हे आवाहन करण्यात येत आहे.

कुक्कुट पक्षांच्या खरेदी-विक्रीस बंदी

आठ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर 

मुगगाव येथे मृत कावळे आढळून आले असून याचे कारण बर्ड फ्लू हे आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मौजे मुगगाव गावा शिवारापासून 10 किलोमीटर त्रिज्येतील अंतापूर, वाहली, चिखली, निवडूंगा, सुप्पावडगाव, भुरेवाडी जोगदंड, वसंतवाडी (ता.पाटोदा) व पांगुळगव्हाण (ता.आष्टी) या 8 गावातील कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा,प्रदर्शन तसेच पशुपक्षांची ने आण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, शिवाय ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.