पाटोदा तालुक्यात भितीचे वातावरण
पाटोदा । अजीज शेख
तालुक्यात मुगगांव व परिसरात 6 जानेवारीपासून पंचवीस-तीस पेक्षा जास्त कावळ्या चा मृत्यू झाला होता या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती, पशुवैद्यकिय विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी दाखल होत मुगगावच्या मृत कावळ्यांचे सम्पल तपासणीसाठी पुण्यात प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, त्यानंतर सोमवारी दुपारी या मृत कावळ्यांचे अहवाल पॉझिटिव असल्याचे रिपार्ट आल्याने एकच खळबळ उडाली असुन प्रशासनही सतर्क झाले आहे, पशुवैद्यकिय विभाग व आरोग्य विभागाचे पथक मुगगावात दाखल झाले असून पशु वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून गावातील 50 च्या वर कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले आहेत तर आरोग्य विभागाच्या पाठक कडून पक्षांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा सर्वे केला जात आहे . कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लू च्या संकटाने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे
देशात अनेक राज्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याची माहिती समोर येत आहे पाटोदा तालुक्यातील मुगगाव परिसरात दि. 6 जानेवारी पासून अचानक कावळ्यांचा मृत्यू होऊ लागला सुरुवातीला 11 कावळ्यांच्या मृत्यूंची माहिती समोर आली त्या नंतर हि संख्या वाढत गेली . पशु वैद्यकीय विभागाकडे हि माहिती गेल्या नातर या विभागाचे पथक त्या ठिकाणी गेले व त्या पथकाने तीन मृत कावळ्याचे नमुने पुण्यातील प्रयोग शाळेत पाठवले. त्या नंतरही काही कावळ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घाबराठी वातावरण निर्माण झाले होते बर्ड फ्लूची शक्यता वर्तवली जात असतानाच सोमवारी दुपारी अखेर त्या मृत कावळ्यांचा रिपोर्ट पुण्यातील प्रयोग शाळेतून आला व या कावळ्यांना बर्ड फ्लू ( क5छ8) या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कावळ्याचे रिपोर्ट पोसितीव आल्या नंतर प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी तत्तीच्या हालचाली सुरु करण्यात आल्या असून पशु वैद्यकीय अधिकारी राख यांच्या सह त्यांचे पथक मुगगाव परिसरात दाखल झाले व त्यांनी गावातील 100 च्या जवळ कोंबड्यांचे रक्ताचे नमुने घेतले असून ते नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहेत तर आरोग्य विभागाचे पथक मुगगावात दाखल झाले असून त्या ठिकाणी पक्षांच्या निकटच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा सर्वे केला जात आहे. त्याच प्रमाणे मंगळवार पासून परिसरात घरोघर सर्वे केला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कोंबड्यांचे रक्त नमुने तपासणार
मुगगाव परिसरातील मृत कावळ्यांचे नमुने पुण्यातील प्रयोग शाळेत पाठवले होते त्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे नमुने बर्ड फ्लू पोसोतीव आले आहेत आता पशु वैद्यकीय विभागाकडून परिसरातील कोंबड्यांच रक्ताचे नमुने घेणार असून ते पुण्यातील प्रयोग शाळेत पाठवणार आहोत अशी माहिती पाटोद्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम राख यांनी दिली.
नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा
मुगगाव या ठिकाणी पक्षांचे रिपोर्ट बर्ड फ्लू पोसितीव आल्याने आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा उपाय म्हणून पथक पाठवण्यात आले असून परीसातील निकट संपर्कातील नागरिकांचा सर्वे करण्यात येणार आहे. नागरिकांनी सांदेदुखी, ताप सद्र्युष्य लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा मंगळवार पासून परिसरातील घरोघरी जाऊन सर्वे केला जाणार आहे अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर. तांदळे यांनी दिली.
Leave a comment