नेकनूर । वार्ताहर
शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन अंधापुरी (ता.बीड) येथे दोन कुटूंबात हाणामारी झाली. गुरुवारी दि.7 दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन 9 जणांवर नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
महेश दासु जगताप यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी दुपारी ते त्यांच्या मुर्शदपूर शिवारातील शेतात असतांना आरोपींनी जुन्या भांडणाचे कुरापत काढून त्यांना व इतरांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली शिवाय त्यांच्या खिशातील दीड हजाराची रक्कम काढून घेतली.यावरुन विकास जगताप, गोविंद जगताप, कमल जगताप व चंद्रकला जगताप (सर्व रा. साखरे बोरगांव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान विकास जगताप यांनीही फिर्याद दिली. आरोपींनी लोखंडी गज व दगडाने मारहाण करत त्यांच्या आईला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तर खिशातील साडेआठ हजाराची रक्कम काढून घेतली. यावरुन शेषेराव जगताप , बाळू जगताप, महेश जगताप, वैभव जगताप व बारक्या जगताप (सर्व रा.अंधापुरी) यांच्यावर नेकूनर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a comment