औरंगाबाद:
औरंगाबादमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. येथील घाटी रुग्णालयात आज, १४ एप्रिल रोजी दुपारी कोरोनाने आणखी एकाचा बळी घेतला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.. त्यामुळं औरंगाबादमधील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.
करोनाची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय वृद्धाला येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात दोन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत जिल्ह्यात २४ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a comment