कोरोनाने पुन्हा डोके वर काढले जिल्ह्यात आणखी तिघांचा बळी

बीड । वार्ताहर

 

जिल्ह्यात आज बुधवारी (दि.6) कोरोनाचे 34 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. दरम्यान मंगळवारी  कोरोनामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा तिघांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 16 हजार 966 झाली आहे. यापैकी 16 हजार 110 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनाबळींचा आकडा 539 इतका झाला आहे.
जिल्ह्यात नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाबळी थांबले होते, परंतु नंतर सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारीही मृत्यूसत्र कायम राहिले असून आणखी तीन बळींची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली. तसेच आज बुधवारी जिल्ह्यातील 709 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 675 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 4, आष्टी 7, बीड 12, गेवराई, परळी तालुक्यात प्रत्येकी 1, माजलगाव तालुक्यात 3 तर पाटोदा, केज, वडवणी तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी दिली.

यंदा तिळगूळ घ्या अन् लस पण घ्या! 

मकर संक्रांतीच्या पर्वात महाराष्ट्रासह देशभर कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होईल, असे स्पष्ट संकेत मंगळवारी मिळाले. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत लसीकरण मोहीम हाती घेण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे केेंद्रीय आरोग्य सचिव  यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावर्षीची संक्रांत आता कोरोनावर यावी, अशीच सगळ्यांची प्रार्थना असून ‘तिळगूळ घ्या... आणि लस पण घ्या,’ असेच या संक्रांतीला म्हणावे लागणार आहे.

‘सिरम’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना 3 जानेवारी रोजी ‘डीसीजीआय’ने परवानगी दिली. त्यानंतरच्या दहा दिवसांत केंद्राने लसीकरण सुरू करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केल्याने हा मुहूर्त संक्रांतीचाच निघतो. 13 किंवा 14 जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होईल. देशभरात निवडक शहरांमध्ये घेतलेल्या रंगीत तालमीतून हाती आलेल्या तपशिलानंतर केंद्राने हा मुहूर्त निवडला. 

केंद्रीय आरोग्य सचिवांनी लसीकरण  मोहिमेच्या सज्जतेचीही माहिती देत सांगितले की, कोरोना लसीचे डोस साठवण्यासाठी करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार ठिकाणी प्रमुख शीतगृहे उभारली असून, याशिवाय देशभरात 37 ठिकाणी व्हॅक्सिन स्टोअर्सदेखील सज्ज आहेत. तेथूनच घाऊक प्रमाणात लसीचे वितरण केले जाईल.

 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण पुढील प्रमाणे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.