बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आता घट होत आहे. आज सोमवारी (दि.4) 479 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 453 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 26 नवे रुग्ण निष्पन्न झाले.
बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 6, आष्टी 2, बीड तालुक्यात सर्वाधिक 10, माजलगाव तालुक्यात 3 तर गेवराई, केज, परळी, पाटोदा व वडवणी या पाच तालुक्यात प्रत्येकी 12 रुग्ण निष्पन्न झाला आहे. आता जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 902 इतकी झाली असून यातील 16 हजार 71 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 533 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान रुग्ण संख्या कमी होत असली तरी येत्या काही दिवसात कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहेे. त्यामुळे कोरोना आजुन संपलेला नाही. नागरिकांनी कोरोनापासून दुर राहण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
Leave a comment