बीड । वार्ताहर

जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी भूलतज्ज्ञ डॉ.सय्यद शाफे यांना कक्षात बोलावून घेत शिवीगाळ केली होती. यात तक्रार करूनही अद्याप त्यावर साधी चौकशी समितीही नियूक्त केलेली नाही. दरम्यान याबाबत उपसंचालकांकडून मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली असली तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रकार यामागे दिसून येत आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ.शाफे यांची मंगळवारी सकाळी ऑन कॉल ड्यूटी होती. याचवेळी डॉ.राठोड यांनी त्यांना संपर्क करून कुठे आहेस रे तु, अशा विचारणा करत अरेरावी केली. त्यानंतर डॉ.शाफे त्यांना जावून भेटले असता त्यांनी शिवीगाळ केली. याबाबत डॉ.शाफे यांनी तात्काळ डॉ.राठोड यांच्या विरोधात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांच्याकडे तक्रार केली. मात्र अद्याप याप्रकरणात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.याबाबत शल्य चिकित्सक डॉ. गित्ते म्हणाले, चौकशी कोणी करायची, याबाबत उपसंचालकांना पत्र देऊन मार्गदर्शन घेणार आहोत, मात्र याप्रकरणी पत्रव्यवहार झालेला नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.