परळी । वार्ताहर
शहरात संभाजीनगर ठाण्याच्या डीबी पथकाने ऑनलाईन बिंंगो जुगारावर दोन ठिकाणी छापे टाकून शुक्रवारी (दि.1) पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात ऑनलाईन बिंगो जुगार खेळविला जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली होती. यावरुन शुक्रवारी डीबी पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या छाप्यात तिघांना पकडून 30 हजर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर दुसर्या छाप्यात 24 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना पकडले. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे धाडसत्र राबविण्यात आले.
Leave a comment