चार महिन्यात वाहतुक शाखेकडून 15 हजार कारवाया

बीड । वार्ताहर

वाहतुक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी जिल्हा वाहतुक शाखेने सरत्या 2020 वर्षातील अवघ्या चार महिन्यात दंडात्मक कारवायांवर जोर दिला. 1 सप्टेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी 15 हजार 298 कारवाया केल्या गेल्या.वाहतुक नियम मोडणार्यांकडून तब्बल 36 लाख 34 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक व सर्व कर्मचार्यांनी या कारवाया केल्या.
वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानुसार दंडाची आकारण केली गेली. प्राणांतिक व गंभीर अपघाषतज्ञांचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या काळात जिल्हा वाहतुक शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रभारींनी विशेष मोहिम हाती घेतल्या. यात मोबाइलवर बोलत वाहन चालवल्याप्रकरणी 4 हजार 542 कारवायात 9 लाख 8 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला.याशिवाय विना हेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी 1 हजार 64 जणांवर कारवायात 5 लाख 32 हजार रुपये, विनासिट बेल्ट वाहन चालवणार्या 9 हजार 237 वाहनचालकांकडून 18 लाख 47 हजार 400 रुपये, तसेच विरुध्द दिशेने रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवणार्या 345 जणांवर कारवाई झाली.त्यांच्याकडून एकुण 3 लाख 45 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. यासह माल वाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतुक केल्याप्रकरणी 110 वाहनचालकांवर कारवाई करुन पोलीसांनी 22 हजारांचा दंड वसुल केला.

एक कोटी 70 लाखांची दंड आकारणी

बीड जिल्हा वाहतुक शाखेने सरत्या वर्षात मोटार वाहन कायद्यातंर्गत तब्बल 65 हजार 743 कारवाया केल्या, यातून 1 कोटी 70 लाख 71 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला. शिवाय कोरोना टाळेबंदीदरम्यान रस्त्यांवर विनापरवाना फिरणाी 603 वाहने स्थानबध्द केली गेली.शिवाय संबंधित वाहनाचालकांवर विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.

अपघातप्रवण स्थळांवर उपाययोजना

बीड जिल्ह्यातून धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याशिवाय राज्य महामार्गही आहेत. या महामार्गावरील ठराविक ठिकाणी प्राणांतिक व गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले होते. गत वर्षभरात वाहतुक शाखेने 22 ठिकाणांची माहिती संकलीत केली. अधिकार्‍यांनी या ठिकाणांना भेटी दिल्या,शिवाय ड्रोन कॅमेर्याव्दारे छायाचित्र संकलीत करुन अपघातांची कारणे शोधून तातडीने संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना सूचवत प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी काम केले गेले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.